एफ. एम. काशेलानी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा व्हिएतनाम देशातील विद्यार्थ्यांशी संवाद

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ःबुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील एफ. एम. काशेलानी इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हिएतनाम देशातील विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणण्याचा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. संवादात विविध गंमतीदार स्पर्धा, आपापल्या देशातील महान व्यक्तींबद्दल चर्चा आदी बाबी घडून आल्या. गूगल मीटद्वारे झालेल्या या संवादात शाळेतील वर्ग ३ च्या निवडक १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. व्हिएतनाम येथील व्हिनस्कूल …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ःबुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील एफ. एम. काशेलानी इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हिएतनाम देशातील विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणण्याचा उपक्रम नुकताच राबविण्यात आला.

संवादात विविध गंमतीदार स्पर्धा, आपापल्या देशातील महान व्यक्‍तींबद्दल चर्चा आदी बाबी घडून आल्या. गूगल मीटद्वारे झालेल्या या संवादात शाळेतील वर्ग ३ च्या निवडक १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. व्हिएतनाम येथील व्हिनस्कूल थँग लाँग या शाळेतील या लू तुएत लुंग शिक्षिकेने हा संवाद घडवून आणण्यासाठी सहकार्य केले. संचालक कुणाल काशेलानी यांच्‍या मार्गदर्शनात हा संवाद यशस्वीरीत्या पार पडला.

काशेलानी शाळेतर्फे कुणाल काशेलानी, कंचन काशेलानी, शुभम देशमुख आणि १२ विद्यार्थ्यांनी तर व्हिनस्कूल थँग लाँग या शाळेतर्फे लू तुएत लुंग यांच्यासह २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील अशा प्रकारच्या संवादाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास चांगल्या प्रकारे वाढतो. तसेच कल्पनाशक्तीही वाढण्यास मदत होते. त्यामुळे भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम घावेत, असे मत कार्यक्रमाच्या यशस्वीतेनंतर शाळेचे अध्यक्ष मनोज काशेलानी यांनी व्यक्त केले.