उत्साह, भक्तीभावाने संत भूमीमध्ये राम जन्मोत्सव
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे श्री संत गजानन महाराज मंदिर पुन्हा बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिरात थाटामाटात होणारा श्रीराम जन्मोत्सव अगदी साध्या पद्धतीने करण्यात आला आहे.
शेगाव शहरातील प्राचीन हनुमान मंदिर परिसर, निर्मलनगर, व्यंकटेशनगर, भैरव आठवडी बाजार, बालाजी फैल, जोगडी फैल, रोकडियानगर, एसबीआय कॉलनी परिसर, मोदीनगर, भूत बंगला परिसर, चंद्रलोक सोसायटी, माळीपुरा आदी भागांत धार्मिक परंपरेने श्रद्धा भक्तिभावपूर्ण वातावरणात घराघरांमध्ये राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. व्यंकटेशनगर येथील भागवताचार्य ह. भ. प. रामकृष्ण महाराज ताकोते यांच्या घरात त्यांची नात अनन्याच्या हस्ते पूजा करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पत्रकार संजय त्रिवेदी यांच्या घरात सुद्धा कुटुंबासह जन्मोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भूषण दाभाडे यांच्या घरात सुद्धा कुटुंबासह रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.