आश्चर्यम्… चक्क विसर्जनावेळी महालक्ष्मीच्या डोळ्यांतून अश्रू!; मलकापुरातील प्रकार
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महालक्ष्मीचा सण घरोघरी भक्तीभावाने पार पडला. अडीच दिवस माहेरी राहून ज्येष्ठा गौरीचे विसर्जन विधिवत पूजा करून झाले. हे करत असताना मलकापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, गौरी मातेचे डोळे पाणावून अश्रू आल्याची घटना घडली. त्यामुळे जुन्या गावात मंगल गेट परिसरातील गोपाळ घनोकार यांच्या घरी दर्शनासाठी गर्दी उसळली. भक्तांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
ज्यांच्या घरी हा प्रकार घडला ते गोपाळ धनोकार यांनी पत्रकारांना सांगितले, की २० वर्षांपासून आमच्या घरी महालक्ष्मी बसतात. यंदा प्रथमच हा चमत्कारित प्रकार बघायला मिळाला. एखादी विवाहिता माहेरावरून सासरी जाते तेव्हा तिच्या डोळ्यांत पाणी येते, अगदीच तसाच हा प्रकार भासला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा प्रकार अफवा असून, सर्व प्रकाशाचा खेळ असल्याचे म्हटले आहे. पुढील लिंकवर जाऊन पहा व्हिडिओ ः https://youtu.be/dA51m2b5Zqk