अंधारात लपाछपी करणे पडले महागात!; खामगावातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंधारात लपाछपी खेळणे ३१ वर्षीय युवकाला चांगलेच महागात पडले. त्याला विकमसी चौकातील मार्केट कमिटी यार्ड कॉम्पलेक्सजवळ खामगाव शहर पोलिसांनी काल, १९ ऑक्टोबरला रात्री साडेअकराच्या सुमारास ताब्यात घेतले. केतनसिंग राजपालसिंग चव्हाण (रा लासुरा जहाँगीर, ता. खामगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. तो अंधारात त्याचे अस्तित्व लपवून काहीतरी …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंधारात लपाछपी खेळणे ३१ वर्षीय युवकाला चांगलेच महागात पडले. त्‍याला विकमसी चौकातील मार्केट कमिटी यार्ड कॉम्पलेक्सजवळ खामगाव शहर पोलिसांनी काल, १९ ऑक्‍टोबरला रात्री साडेअकराच्‍या सुमारास ताब्‍यात घेतले. केतनसिंग राजपालसिंग चव्हाण (रा लासुरा जहाँगीर, ता. खामगाव) असे ताब्‍यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. तो अंधारात त्याचे अस्तित्व लपवून काहीतरी गुन्‍हा करण्याच्‍या उद्देशाने लपलेला होता. पेट्रोलिंग करताना पोलिसांना मिळून आला. त्‍याच्‍याविरुद्ध पोलीस उपनिरिक्षक सम्राट भिमराव ब्राह्मणे यांच्‍या तक्रारीवरून गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकाँ गजानन बोरसे करत आहेत.