शेगाव तालुक्यातील माटरगावच्या युवकाचा बोर्डी नदीपात्रात बुडून मृत्यू! 

 
शेगाव (संतोष देठे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील रहिवासी ३५ वर्षीय युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना २९ जूनच्या सकाळी उघडकीस आली आहे. प्रकरणी जलंब पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
 
Advt.👆
 अनिल त्र्यंबक मोरे असे कृतक युवकाचे नाव आहे. माटरगाव नारखेड रोडवरील पुला जवळील बोर्डी नदीच्या पात्रामध्ये २८ जूनच्या सायंकाळी अनिलचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. ठाणेदार अमोल बारपात्रे व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम पवार, पोलीस हवालदार तुकाराम इंगळे, रवी गायकवाड, सचिन बावणे, संदीप गावंडे यांनी पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी अनिलचा मृतदेह सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.