'तू हमारे तरफ गुस्से से क्यू देख रहा' म्हणत तरुणावर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला; खामगांव येथील घटना.!
Jul 3, 2025, 10:47 IST
खामगांव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :दोन भावांनी एका तरुणावर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये तरुणाच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खामगाव येथील सिल्वरसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृती गंभीर झाल्याने त्याला अकोला हलविण्यात आले आहे. दोन्ही भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव येथील ताज नगर येथील ओपेस खान रहीम खान व त्याचा मित्र सेट मुजम्मिल शेख सलाउद्दीन हे दोघेजण टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले होते. बसस्थानका दरम्यान हरी फाईल भागातील हैदर खान अन्वर खान व त्याचा भाऊ इमरान खान अन्वर खान हे दोघे तेथे आले व 'तू हमारे तरफ गुस्से से क्यू देख रहा',असे म्हणत वाद केला आणि लोखंडी पाईपने शेख मुजम्मिल शेख सलाहुद्दीन यांच्या डोक्यावर व पायावर वार करून त्याला गंभीर जखमी केले त्यामुळे त्याला उपचारासाठी सिल्वरसिटी हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते परंतु डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला अकोला येथे हलविण्यात आले. या प्रकरणी खामगांव पोलिसात आरोपी दोघां भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.