आम्ही रिक्स घेतो जरा तुम्ही पण घ्या..! लोणार तालुक्यातील सर्पमित्रांचे तहसीलदारांना साकडे..

 

लोणार(सचिन गोलेच्छा:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कुठे ही साप निघो, विषारी असो या नसो आम्ही धावत जातो. त्या सापाला पकडून जंगलात सुरक्षित पणे नेवून सोडतो. कधी कधी हे करताना जीवावर बेतते हे माहित असूनही नागरिकांच्या व सापाच्या सुरक्षेसाठी ही जोखीम आम्ही उचलतो. हि आमच्या साठी रिस्क आहे. या रिस्क ची शासनाने थोडी रिस्क घेऊन काही सुविधा आम्हाला द्याव्यात अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणी मित्र संघटना यांच्या नेतृत्वाखाली वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशन लोणार मेहकर व सर्पमित्राच्या मागणी संदर्भात तहसीलदार लोणार यांना निवेदन देण्यात आले.

  साप चावल्यानंतर मृत्युचे प्रमाण अधिक आहे. घरात, परिसरात साप निघाल्यास प्रत्येक जण घाबरतो. आणि सर्पमित्रांना फोन करून बोलावून घेतात. हे सर्पमित्र लगेच तेथे जाऊन सापाला पकडून तो सुरक्षित पणे जंगलात नेऊन सोडतात. लोणार तालुक्यातील सर्पमित्रांनी मागील काही वर्षात नाग, घोणस, मन्यार, धामण, अजगर, रूकी अशा विविध जातीचे दिड ते दोन हजार सापांना जीवदान दिले. कधी कधी जीवावर बेतते हे माहित असूनही नागरिक व सापांच्या सुरक्षेसाठी ही जोखीम उचलणाऱ्या या तरुणांना सुरक्षा कवचाची गरज आहे. त्यामुळे प्राणीमित्र विमा योजनेअंतर्गत सर्पमित्रांना २५ लाखाचा अपघाती विमा मंजूर करावा. सर्पमित्र, प्राणीमित्र यांच्या कुटुंबीयांना आरोग्य विम्यामध्ये समाविष्ट करावे. साप पकडण्याच्या कामाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्यावा. सर्पमित्रांना, प्राणीमित्रांना ओळखपत्र द्यावे , सर्पमित्रांची व प्राणीमित्रांची माहिती देणारे नोंदणी करणारे नेटवर्क आणि पोर्टल उभारावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर सर्पमित्र बंटी विजय नरवाडे, सर्पमित्र शंकर भोसले, सर्पमित्र ऋतिक सुसर, सर्पमित्र चंदू अंभोरे, सर्पमित्र विनय कुलकर्णी, सर्पमित्र सचिन कापुरे, कमलेश आगरकर, वनिताताई बोराडे, विलास जाधव, सचिन मस्के, उमेश चिपडे यांच्या स्वाक्षरी आहेत.
 सर्पमित्र सचिन कापुरे म्हणतात...
नागरिक सुरक्षित राहावेत व सापांना जीवदान मिळावे यासाठी मोठी जोखीम उचलत आम्ही काम करतो. अनेक वेळा अपघात होवू शकतो. निः स्वार्थ भावनेने आम्ही हे काम करत असलो तरी यात फार मोठी जोखीम आहे. यामुले शासनाने सर्पमित्रांना ओळखपत्र द्यावे व अपघाती विमा मंजूर करावा