अवकाळी पावसाने शेतात लावलेले टरबूज मातीत मिळाले! लाखो रुपये खर्च पाण्यात; शासनाकडून मदत मिळण्याची आशा..!

 
 खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या आठवड्यापासून जिल्हाभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्यापिकांचे अतोनात नुकसान होत आहे. खामगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे टरबुजाचे पीक मातीमोल झाले आहे.

 खामगाव तालुक्यातील रामदास लक्ष्मण अंभोरे, निनाजी दिनकर अंभोरे, ज्ञानेश्वर शंकर कराळे यांनी आपल्या शेतात एक्कर भरून अधिक क्षेत्रात टरबूज पिकाचे लागवड केली होती. ऐन टरबूज काढणीच्या वेळेवर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने लाखो रुपये खर्च करून हाताशी आलेले टरबूज मात्र मातीमोल झाले आहेत. झालेल्या टरबूजच्या पिकाचे नुकसान म्हणून शासनाने योग्य ते आर्थिक मदत करावी. अशी मागणी निपणा येथील शेतकऱ्यांची आहे.