पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा नदीत बुडून मृत्यू! शेगाव तालुक्यातील घटना...
Updated: Oct 10, 2024, 11:45 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. काल,९ ऑक्टोबरला शेगाव तालुक्यातील बेलुरा येथील बोर्डी नदी पात्रात ही घटना घडली.
कृष्णा राजू फुटवाईक(१४ रा. बेलूरा) आणि शुभम गजानन पुरी(१४, रा. माटरगाव) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. जलंब पोलीस स्टेशन हद्दीत बेलुरा नदीपात्रात काल ही घटना घडली. दोघे पोहण्यासाठी गेले होते, पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. याप्रकरणी जलंब पोलीस अधिक तपास करत आहेत.