माजी सैनिकाच्या घरात चोरट्यांनी केला हात साफ! सोने लांबवले, रोकडही लंपास!एक संशयित ताब्यात, खामगाव शहरातील घटना

​​​​​​​

 

खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा:भागवत राऊत)माजी सैनिकाच्या घरातुन सोने व नगदी रोकड लंपास केल्याची घटना २ मे च्या रात्री खामगाव शहरात घडली आहे. 

झाले असे की मध्यरात्री माजी सैनिक शिवचरण जयराम सरदार वय ४५ वर्ष रा - शिक्षक कॉलनी (खामगाव) हे त्यांच्या परिवारासह घरातील हॉलमध्ये झोपले होते. याच वेळी मध्यरात्री ११.३० ते ३.३० च्या सुमारास चोरट्याने त्यांच्या घराच्या बाथरूम जवळील दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातील आलमारीतून ३.५ तोळे सोन्याची गाहूपोथ ६ ग्राम सोन्याची पोथ, नगदी ४५ हजार रुपये  मुद्देमाल लंपास केला आहे.  शिवचरण सरदार यांनी तसे खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. खामगाव शहर पोलिसांनी सरदार यांच्या तक्रारीवरून ऐका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास एएसआय  मोहन करूटले करीत आहेत.