आई वडील शेतात कापूस वेचत होते, ३ वर्षीय चिमुकली वर वन्यप्राण्याने हल्ला केला! खामगाव तालुक्यातील पातोंडा पेडका येथील घटना...
Oct 25, 2023, 10:29 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील पातोंडा पेडका शिवारात काल,२४ ऑक्टोबरच्या सकाळी ३ वर्षीय चिमुकलीवर वन्यप्राण्याने हल्ला केला. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
परसराम महादेव कटोने (३५, रा. पातोंडा) हे पत्नी व ३ वर्षीय मुलगी आराध्याला घेऊन कापूस वेचायला शेतात गेले होते. पती पत्नी कापूस वेचणी करीत असताना मुलगी आराध्या बाजूला खेळत होती. यावेळी अचानक तडसाने आराध्यावर हल्ला केला. तेवढ्यात बाजूच्या शेतात काम करणाऱ्या भानुदास रामदास मुंडाले यांनी आरडाओरड करून तडसाला हाकलून लावले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या हल्ल्यात आराध्याच्या कानाला , चेहऱ्याला, हाताला दुखापत झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.