अटाळीत  जाणारे मुख्य रस्ते बंद!निवेदन देऊनही सात दिवसांत अतिक्रमण न हटवल्याने गावकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू!

 

खामगाव(भागवत राऊत:बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) अटाळी गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढा अन्यथा गाबकऱ्यांसोबत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अटाळी गावचे माजी सरपंच डॉ.दिलीप काटोले यांच्यासह गावकऱ्यांनी १६ जून रोजी एका निवेदनाद्वारे दिला होता.मात्र तरीही प्रशासनाने त्याची दाखल न घेतल्याने आज २६ जून रोजी डॉ काटोले यांच्यासह अटाळी येथील गावकरी 'गटविकास अधिकारी' खामगाव यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

अटाळी गावातील श्री संत भोजने महाराज विठ्ठल- रुखमाई संस्थानचा मुख्य रस्ता,जि.प.मराठी प्राथमिक, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खाजगी दवाखाने, पिण्याच्या पाण्याचे रस्ते, लग्न समारंभाच्यावेळी निघणारे मिरवणुक मार्ग, शेतकऱ्यांच्या शेतात,गुरे-ढोरांचे, अटाळी बस स्थानकावर येणारे मुख्य रस्ते यावर मोठ्या प्रमाणात गावातील काहींनी अतिक्रम करून गावात जाणारे गावात जाणारे मुख्य रस्तेच बंद केले आहेत.गेल्या वर्षभरापासून या विरुद्ध वेळोवेळी संबंधित कार्यालयाकडे डॉ. दिलीप काटोले यांना तक्रार केली होती. तरीही प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.त्यामुळे शेवटी उपोषणाला बसण्याची वेळ अटाळी येथील माजी सरपंच डॉ.काटोले यांच्यासह गावकऱ्यांवर आली आहे.