विजेच्या लपंडावाला तरोडावासी वैतागले! आभाळात ढग दाटताच बत्ती होते गुल; थोड्याशा पावसातही रातभर लाईट गायब! गावकरी म्हणतात, "आम्ही बी माणसं आहों...."
May 18, 2025, 21:54 IST
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) होय...ही व्यथा आहे मोताळा तालुक्यातील तरोडा गावची. गेल्या ३ – ४ दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचे वातावरण आहे. याचा फटका सर्वाधिक बसतोय तो ग्रामीण भागाला... पाऊस आणि वादळ तसे शहरातही येते, पण शहरात श्रीमंतांची वस्ती असते, नेत्यांचा धाक असतो, त्यामुळे चुकून झालीही वीज गायब तरी महावितरणचे कर्मचारी धावत पळत जाऊन खंडित झालेला वीज पुरवठा सुरू करतात.. मात्र इकडे गावखेड्यातही माणसं राहतात याचा विसरच महावितरण वाल्यांना पडतो.. मोताळा तालुक्यातील तरोडा गावात तर २–३ दिवस झाले वीज गायब आहे..त्यामुळे ग्रामस्थ हैराण परेशान झालेत..लहान लहान मुलाबाळांना अंधारात आणि प्रचंड उकाड्यात झोपी घालावे लागत आहे, त्यामुळे रातभर मुलाबाळांच्या रडण्याचे आवाज गावात येत आहे..मात्र महावितरण वाल्यांना वाटत की गावात माणसाचं राहत नाही..
पावसाचे वातावरण दिसताच तरोडा शिवारातील विद्युत पुरवठा बंद होतो.यामध्ये नागरिकांची गैरसोय होत आहे. पाऊस पडता ग्रामस्थावर अंधारात राहण्याची वेळ येते.
मोताळा तालुक्यातील तरोडा, कोथळी या भागांमध्ये गेल्या तीन दिवसापासून वीज पुरवठा वारंवार बंद होण्याचा प्रकार दिसून येत आह. थोडाही पाऊस यायला सुरुवात झाला की वीज पुरवठा लगेच बंद पडतो त्यामुळे रात्र रात्रभर अंधारात राहण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. तरोडा शिवारामध्ये गेल्या तीन दिवसापासून ग्रामस्थांना अंधारात राहण्याची वेळ येत आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांच्याकडे तात्काळ लक्ष देऊन वारंवार होणाऱ्या बिघाडावर उपाययोजना कराव्या. वरिष्ठांनी देखील लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.