पाऊले चालती पंढरीची वाट!"विठ्ठल भक्तांसाठी"कामाची बातमी!खामगाव येथून पंढरीला 'या' तारखेला रेल्वेच्या दोन विशेष फेऱ्या..!

 
 खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आषाढी वारी साठी पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठल भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता खामगाव वरून दोन विशेष रेल्वेच्या फेऱ्यांचे आयोजन रेल्वे विभागामार्फत खास करून विठ्ठल भक्तांसाठी करण्यात आले आहे.

दरवर्षी खामगाव येथून आषाढी वारी निमित्त पंढरपूरला विठ्ठल भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता. रेल्वे प्रशासनाने विशेष दोन रेल्वे सेवा सुरू केल्या आहेत. खामगाव - पंढरपूर या मार्गावर ऐकून दोन विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.ह्या फेऱ्या ३ ते ७ जुलै दरम्यान धावणार आहेत.खामगाव कडून पंढरपूर कडे जाणारी गाडी क्रमांक ०११२१ ही ३ जुलै,६ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता खामगाव रेल्वे स्थानकातून सुटणार आहे.ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३:३० वाजता पंढरपूरला पोहचणार आहे.
पंढरपूर वरून परतीस येणारी गाडी क्रमांक ०११२२ ही गाडी ४ जुलै, ७ जुलै रोजी पहाटे पाच वाजता पंढरपूर येथून सुटणार असून संध्याकाळी ७:३० वाजता खामगावला पोहोचणार आहे. या दोन्ही विशेष गाड्यांना जलंब,नांदुरा, माळीपूरा, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव,मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड यासह कुर्दुवाडी या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. त्या गाड्यांमध्ये दोन एसी -३ टियर डबे,१० स्लीपर डबे, ४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे,दोन सामान वाहू यासह गार्ड ब्रेक व्हॅन्स असे डब्याचे संरचनात्मक नियोजन विठ्ठल भक्तांसाठी करण्यात आले आहे. विठ्ठल भक्तांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आपले तिकिटे लवकर आरक्षित करण्याचे आवाहन रेल्वे विभागामार्फत करण्यात आले आहे.