खामगावातून सुटणाऱ्या विशेष विठ्ठलदर्शन रेल्वे गाडीला दाखवणार हिरवी झेंडी; दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव ...!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) आषाढी एकादशी निमित्य विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव 3 जुलैला खामगाव येथील रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून विठ्ठल दर्शन रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखवणार आहे ..
दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील विठ्ठलभक्त पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात विठ्ठल भक्तांचा प्रवास सोईचा व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या मदतीने दरवर्षी खामगाव रेल्वे स्थानकातून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ही रेल्वे गाडी सोडण्यात येते. या विठ्ठलदर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी आज दिनांक 3 जुलै रोजी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे.
विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे खामगाव येथील रेल्वे स्थानकावर सकाळी 11 वाजता उपस्थित राहणार आहेत त्यानंतर मंत्री महोदयांच्या हस्ते विठ्ठल दर्शन रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखविल्या जणार आहे त्यानंतर हि गाडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्त होणार आहे . यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे राजेश मिरगे तालुकाप्रमुख राजु बघे , रामा थारकर शिवसेनेचे पदाधिकारी, वारकरी, आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत.