काहीतरी चावल..काय चावल समजल नाही! महिलेने जीव गमावला...

 

खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) अज्ञात किटकाच्या चाव्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील रोहणा येथे आज ३ जून रोजी घडली.

रोहणा येथील सौ. इंदुबाई पुरुषोत्तम वावगे वय ५५ ह्या शनिवारी पहाटे घर व अंगणाच्या साफ, सफाईसाठी अंगणात पडलेला झाडू उचलत असतांना त्यांना अज्ञात विषारी किटकाने चावा घेतला. यामध्ये त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सौ. इंदुबाई यांना विषारी किटकाने चावा घेतल्यानंतर त्या ठिकाणी विषारी किटक की साप ? याचा शोध त्वरित घेण्यात आला. परंतु तेथे काही आढळून आले नाही. व सापाच्या दंशाचे लक्षणही त्यांच्या शरीरावर कोठेही दिसत नव्हते. त्यामुळे विषारी किटक की आणखी वेगळ्या किटकाने चावा घेतला याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. उपचार सुरू असतांना सकाळी ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.