डोलारखेड- माटरगाव रोडवर वाढलेली झुडूपे
अपघात वाढले; ग्रामपंचायतीने बांधकाम विभागाकडे केली तक्रार
Nov 3, 2021, 19:58 IST
जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः डोलारखेड ते माटरगाव रोडवर भरपूर काटेरी झुडपे वाढलेली आहेत. या रोडला भरपूर वळण रस्ते असल्यामुळे समोरून येणारा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला दिसत नाही.
आजपर्यंत बऱ्याच वाहन धारकांची यामुळे समोरासमोर धडक झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. संबंधित कंत्राटदाराने रोडलगत असलेली काटेरी झुडपे जेसीबीने साफसफाई करावी. भविष्यात काही मोठा अपघात झाल्यास याला संबंधित बांधकाम विभाग व कंत्राटदार जबाबदार राहतील. लवकरात लवकर रोडची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी गट ग्रामपंचायत डोलारखेडच्या सरपंच सौ. प्रिया रामेश्वर काळे व उपसरपंच सौ. वैशाली प्रवीण देठे आणि ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.