खळबळजनक! खामगाव तालुक्यातील माथनी शिवारात आढळला शाहरुख खानचा मृतदेह...घातपात झाला?

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातून धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. खामगाव तालुक्यातील माथनी शिवारात शाहरुख खान नावाच्या युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.हा घातपात असल्याची चर्चा शहरात सुरू असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

खामगावच्या माथणी शिवारात एका तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आज २४ मे रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास आढळून आला आहे. मृताचे नाव शाहरुख खान असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांमध्ये हा घातपात असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
पोलिसांची भूमिका
घटनेची माहिती मिळताच खामगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. "प्राथमिक तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. सर्व बाजूंनी तपास करत आहोत," असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
माथणी परिसरात अचानक मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व खळबळीचे वातावरण आहे. 'घातपात की अपघात?' याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. मृत शाहरुख खान कोण, तो कुठला रहिवासी आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.