शिष्यवृत्ती परीक्षा... खामगावची अवंती शिंगाडे विदर्भात प्रथम!

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगावच्या सरस्वती विद्या मंदिरची विद्यार्थिनी अवंती अरविंद शिंगाडे हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (आठवी) विदर्भातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
अवंतीने प्राप्त केलेल्या गुणांची टक्केवारी ८९.२६ इतकी असून, तिने महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीत (शहरी) १६ वे स्थान मिळवले आहे. बुलडाणा जिल्ह्यातून ती पहिली अाली आहे. अवंतीने यशाचे श्रेय आई, वडील, शिक्षक डी. पी. दांडगे यांच्यासह तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांना दिले आहे. अवंती ही जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे समुपदेशक अरविंद शिंगाडे यांची कन्या आहे. यशाबद्दल तिचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.