लग्न जमत नाही म्हणून एकुलत्या एक संतोषने उचलले टोकाचे पाऊल; घरी कोणी नसताना गळफास लावून केली आत्महत्या ! संग्रामपुर तालुक्यातील बावणबीर गावात शोककळा...
May 29, 2024, 13:01 IST
सोनाळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात ३१ वर्षीय तरुणाने लग्न होत नसल्याच्या कारणातून आत्महत्या केल्याची घटना काल २८ मेच्या दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे बावणबीर गाव सुन्न झाले आहे.
संतोष शहादेव घाटोळे (३१ वर्ष) असे आत्महत्याग्रस्त युवकाचे नाव असून तो शेतमजूर म्हणून काम करायचा. संतोष हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. लग्न होत नसल्याने नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले. गरिबीमुळे संतोषचा विवाह जुळत नव्हता. एकीकडे वय निघून जात होते. त्यामुळे संतोष प्रचंड मानसिक तनावाखाली होता. यातूनच घरी कोणी नसताना गळफास लावून संतोषने स्वतःला संपविले. त्याला तीन विवाहित बहिणी आहेत. याप्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.