वीजचोरी करणाऱ्या बोरजवळ्याच्या बाबुराव विरुद्ध पोलिसांनी केला गुन्हा दाखल! २ हजार २४२ युनिट चोरले होते
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ग्रामीण भागात वीज चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. विद्युत तारेवर अनाधिकृत पणे आकोडा टाकून वीज चोरी केल्याप्रकरणी एका गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील बोरजवळा येथील बाबुराव डिगांबर दाभाडे (वय ४५) यांनी त्यांच्या घरासमोरील महाविरण कंपनीच्या लघुदाब विद्युत वाहिणीवर अनधिकृतपणे आकोडा टाकून बारा महिन्यांच्या काळात २ हजार २४२ युनीटची म्हणजच ५ हजार ५७९ रुपयांची वीज चोरी केली. अशा आशयाची तक्रार २० सप्टेंबर रोजी महावितरणचे पिंपळगाव राजा भाग १ चे सहाय्यक अभियंता यांनी खामगाव शहर पोस्टेला दिली. यावरुन पोलिसांनी आरोपी डिगांबर दाभाडे याच्या विरुध्द कलम १३५ भा. वि. का प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खामगाव शहर पोस्टे मधील सहाय्यक पोलिस निरीक्षक इंगळे करीत आहेत.