बोरी-अडगावात शांतता समितीची बैठक! ठाणेदार नाईकनवरे म्हणाले, कायदा पाळणाऱ्यांचा सन्मान पण टाळणाऱ्यांना सोडणार नाही..
Aug 28, 2023, 08:41 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव तालुक्यातील बोरी - अडगाव येथे आगामी सण उत्सवानिमित्त खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी येणारे सर्व सण - उत्सव सर्वांनी उत्साहात साजरे करा मात्र गावातील शांतता भंग पावणार नाही यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करा असे आवाहन केले.
आगामी काळात पोळा, गणेशोत्सव, ईद, श्रावण महिन्यातील कावड यात्रा असे विविध सण - उत्सव साजरे होणार आहेत.सर्व सण - उत्सव शांततेत साजरे होण्यासाठी पोलीस प्रशासन, गावातील सरपंच, पोलीस पाटील यासह ग्रामसुरक्षा दल, प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये शांतता समितीची बैठक पार पडली. कायदा पाळणाऱ्यांचा सन्मान करू पण टाळणाऱ्यांना सोडणार नाही असे यावेळी ठाणेदार नाईकनवरे म्हणाले.
यावेळी सरपंच,पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.