पालकांनो लेकरांना जपा! खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडला खामगाव तालुक्यातील पळशीचा आर्यन; जीव गमावला...
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लेकरांची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे अलीकडे जिल्ह्यात घडलेल्या घटनांवरून समोर येत आहे. खामगाव तालुक्यातील पळशी बु येथे खेळता खेळता एक मुलगा पाण्याच्या टाकीत पडला अन् त्याने जीव गमावला. आता त्याच्या आई वडिलांचा आक्रोश एकूण अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी होतय..
आर्यन कृष्णा नागे (१०, रा. पळशी बु, ता.खामगाव) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. काल,१७ मे च्या सायंकाळी आर्यन घरात खेळत होता, आर्यनची आई आणि वडील त्यावेळी शेतात गेलेले होते. खेळता खेळता आर्यन घरातील पाण्याच्या टाक्यात जाऊन पडला. सायंकाळी त्याची आई घरी आली,त्यावेळी पाण्याची टाकी उघडी दिसली. आर्यनचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यु झाल्याने कळताच त्याच्या आईने एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मृतदेह पाण्याच्या टाकीच्या बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.