संतापजनक! मलकापूर तालुक्यात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विटंबना; धर्मकंटकाचे विकृत कृत्य...
Sep 30, 2024, 08:58 IST
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):मलकापूर तालुक्यातील वरखेड गावात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विटंबना झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रखेड गावात प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर आहे. राम, लक्ष्मण,सीता यांच्या मुर्त्या आहेत. २८ सप्टेंबरच्या सकाळी कोकिळा बाई तायडे या मंदिरात सफाईसाठी गेल्या असता मूर्तीची विटंबना झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. राम,लक्ष्मण ,सीता यांच्या गालावर कशाने तरी ठेचल्याचे त्यांना दिसले, रामाच्या उजव्या हाताचे बोट सुद्धा अज्ञात विकृताने तोडले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांना शांततेचे आवाहन केले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.