संतापजनक! सहाय्यक अध्यापक डीगोळेचे अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन! निलंबित करा अन्यथा शाळेला कुलूप ठोकू..! संतप्त ग्रामस्थांचा निर्धार! संग्रामपूर तालुक्यातील घटना

 
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) संग्रामपूर तालुक्यातील टूनकी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विकृत शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याची संतापजनक बातमी आहे. प्रकार उघडकीस येताच परिसरात सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात संतप्त पालकांनी, ग्रामस्थांनी , तसेच शाळा व्यवस्थापन समितीनेही काल १३ फेब्रुवारीला गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली. त्यात विकृत अध्यापक डिगोळे याला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
घटना १० फेब्रुवारी रोजीची आहे. झालेला प्रकार पालकांना माहिती होताच, त्यांनी शाळेत धाव घेतली. पुढे शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांची बैठक झाली. विकृत डिगोळेची तक्रार करायची असे पालकांसह शाळा समितीने ठरविले त्यानुसार काल १३ फेब्रुवारीला त्याची तक्रार संग्रामपूर पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.डी.जे डीगोळे असे विकृत मास्तराचे पूर्ण नाव आहे. तो सहाय्यक अध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याच्याविरोधात ग्रामस्थ तसेच शाळा समितीने तक्रार दिली. विकृत डीगोळेला सेवेतून निलंबित करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली,अन्यथा शाळेला कुलूप ठोकू असा निर्धार देखील संतप्त पालकांनी केला. या घटनेने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली. या विकृत मास्तरावर याआधीही गुन्हे दाखल असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.