इंस्टाग्राम वर आक्षेपार्ह 'पोस्ट' ! बोरी अडगाव मध्ये तणाव; टायर जाळले, गावात पोलिसांचा ताफा
Nov 21, 2023, 16:03 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव गावातील युवकाने इन्स्टाग्राम वर आक्षेपार्ह मजकूर(पोस्ट) टाकल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी टायर जाळून व गावबंद करून घटनेचा निषेध केला.
पोलिसांचा मोठा फोजफाटा गावात तैनात करण्यात आला आहे. यामुळे गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एका युवकाने इंस्टाग्राम वर छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे आज मंगळवारी लक्षात आले. यापरिणामी गावकऱ्यांत तीव्र प्रतिक्रिया उमटली. गाव बंद चे आवाहन करून रस्त्यावर टायर जाळण्यात आले. गावामध्ये खामगाव पोलिसांचा मोठा फौज फाटा दाखल झाला असून तणावपूर्ण शांतता आहे.
सदर युवकाला पोलिसांनी तात्काळ अटक केल्याने तणाव काहीसा निवळला आहे.