खामगावात नवविवाहितेला १ लाखासाठी उपाशी ठेवलं, पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा"! नात्यात "भरोसा" उरला नाही? 

 
 खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रेमविवाह करून सुखाचा संसार थाटण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खामगावच्या नवविवाहितेचा सासरच्या मंडळींनी 'हुंड्यासाठी नरक' केला. माहेरून १ लाख रुपये रोख आणि महागड्या वस्तू आणाव्यात म्हणून विवाहितेला मारहाण, शिवीगाळ करून उपाशी ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. 
काय आहे प्रकरण?

पीडिता: सौ रजनी शुभम संगेले, रा. मेहतर कॉलनी, सतीफैल, खामगाव पती शुभम राजू संगेले, रा. रेखा प्लॉट, कमली बाबा मंदिराजवळ या दोघांचा प्रेमविवाह पद्धतीने विवाह झाला होता. सुरुवातिला लग्नानंतर काही दिवस सर्व सुरळीत होतं. नंतर सासरच्यांनी हुंड्याची मागणी सुरू केली.

पैशाअभावी छळ सुरू रजनीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने १ लाख रुपयांची मागणी पूर्ण होऊ शकली नाही. याचा राग मनात धरून पती शुभम, सासरे राजू संगेले, सासू राधा संगेले, दीर करण व शंकर संगेले यांनी मिळून रजनीचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. 

भरोसा सेलमध्येही सुधारणा नाही

त्रास असह्य झाल्याने रजनीने बुलढाणा येथील भरोसा सेलमध्ये तक्रार दाखल केली. समुपदेशनानंतरही सासरच्यांच्या वागणुकीत सुधारणा न झाल्याने भरोसा सेलच्या आदेशानुसार २२ मे रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास शिवाजीनगर 
पोलीस स्टेशनचे अंमलदार विजय उभे तपास करत आहेत.