मोबाइल चोरट्यांनी खामगाव शहर पोलिसांच्या नाकात दम आणला!; आणखी दोघांचे मोबाइल घेऊन पसार
उमेशचंद्र रमेशचंद्र देशमुख (रा .घाटपुरी नाका खामगाव) हा २५ डिसेंबरला साडेदहाच्या सुमारास डाॅ. बावस्कर यांच्या दवाखान्यासमोरून घरी येत असताना दोघे मोटारसायकलीवर आले. उमेशजवळ मोटारसायकल थांबवून त्यातील एकाने दवाखान्याचे काम आहे असे सांगून मोबाइल मागितला. मोबाइल घेताच दुसऱ्याने उमेशला ढकलून दिले व दोघे मोटारसायकलीवरून पसार झाले. त्यातील एकाला उमेशने ओळखले असून, त्याचे नाव अंकुश देशमुख (२८) असल्याने त्याने पोलिसांना सांगितले. दुसरा व्यक्ती अनोळखी आहे. चोरून नेलेला मोबाइल ५ हजार रुपयांचा होता. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक नीलेश सरदार करत आहेत.
दुसरी घटना अमृतनगरात घडली असून, ओम नितीन गुजर (१६, रा. कृषीनगर खामगाव) या मुलाने तक्रार दिली आहे. तो २५ डिसेंबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास मित्राची वाट पाहत उभा होता. दोघे मोटारसायकलवरून आले. त्यांनी त्याला मोबाइल मागितला. पण ओमने दिला नाही. त्यामुळे दोघांनी त्याला चापटबुक्क्यांनी मारहाण करून ५ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून पळ काढला. ओमने दिलेल्या तक्रारीनुसार, चोरट्यांचे वय एकाचे २८ तर दुसऱ्याचे ३० आहे. तपास सहायक फौजदार बळीराम वरखेडे करत आहेत.