हातावर मेहंदी अन् दोन नवरदेवांची वरात पोलीस ठाण्यात! रात्रभरानंतर जामीनावर सुटका.....! खामगाव तालुक्यातील चिंचपूरच्या नवरदेवांनी असं काय केलं? दबंग ठाणेदार कैलास चौधरी यांची कारवाई..!
May 23, 2025, 20:16 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिंचपूरच्या दोन्ही नवरदेवाची वरात थेट पोलीस स्टेशनच्या दारात... होय... बातमीचे हेडिंग वाचून कुणाची बुचकळ्यात पडेल. मात्र हो नवरदेव म्हणून घोड्यावर बसलेल्या राहुल राजेंद्र रोळे आणि संकेत इंगळे यांनी केलचं तसं म्हणून पोलिसांनी त्यांना उचलून ठाण्यात न्यावं लागलं आहे...अखेर रात्रभरानंतर दोघा नवरदेवांची जामीनावर सुटका करण्यात आली...
त्याचे झाले असे की,राहुल राजेंद्र रोळे (२८) रा. चिंचपूर याचे लग्न १९ मे रोजी होते. यावेळी राहुलने १८ मे रोजी रात्री गावातून धुमधडाक्यात मिरवणूक काढली होती. या मिरवणूक मध्ये लग्नाच्या जोशात तलवार हातात घेऊन डान्स केला . राहुलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला...
मग त्याच गावातील संकेत इंगळे (२७)रा.चिंचपूर याचेही लग्न २० मे रोजी होते. त्याच्याही लग्नाची मिरवणूक १९ मे रोजी गावातून होती. आदल्या दिवशी राहुलने मिरवणुकीमध्ये तलवार फिरवल्याने संकेतच कसं काय मागे राहणार? मग त्यानेही होऊन जाऊदे धमाल म्हणत हातात तलवार घेऊन मिरवणूक मध्ये डान्स केला.दोघांचेही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.हिवरखेड पोलिसांपर्यंत व्हिडीओ पोहोचले. हिवरखेड पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार कैलास चौधरी यांना माहिती मिळताच दोन्हीही नरदेवांच्या हातावरची मेहंदी सुकण्याच्या आधीच दोघांनाही पोलिसांनी अटक केली.. रात्रभर जेलची हवा खाल्ल्या नंतर आज दोन्हीही नरदेवांची कोर्टातून जामीनावर सुटका करण्यात आली आहे.