मनोज जरांगेंनी सरकारला वेळ देऊन उपोषण सोडले! खामगाव, शेगाव, मलकापुरसह जिल्हाभरातील आंदोलकांनी उपोषण सोडले...

​​​​​​​

 

बुलडाणा/शेगाव( ज्ञानेश्वर ताकोते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले होते. सरकारच्या यशस्वी शिष्टाईनंतर सरकारला २ जानेवारी पर्यंतचा वेळ देऊन मनोज जरांगे पाटील यांनी आज,२ नोव्हेंबरला सायंकाळी उपोषण मागे घेतले. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या उपोषणांची सांगता झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, राहेरी बु, मोताळा, मलकापूर येथेही मराठा समाज बांधव उपोषणाला बसले होते. बुलडाणा आणि चिखलीत काल एकदिवसीय लाक्षणिक उपोषण झाले.  दरम्यान आज मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या उपोषणाची सांगता झाली. शेगाव येथे उपोषण सांगता होण्याआधी कँडल मार्च काढण्यात आला.त्यानंतर शिवकन्या अनन्या ज्ञानेश्वर ताकोते, कांदबरी ज्ञानेश्वर ढमाळ, मनवी मच्छिंद्र  ढमाळ , आराध्या श्याम आढाव, शिवबा ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले..