लॉटरीचा किस्सा...! १० रुपयांत मिळाले ५ हजार!

माटरगावच्या अंध व्‍यक्‍तीची दिवाळी झाली मस्त!
 
जलंब (संतोष देठे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लॉटरीचे तिकिट काढून नशिब आजमावून पाहण्याची हौस अनेकांना असते. माटरगाव येथील एका अंध व्यक्‍तीला हौस नव्‍हती, पण पहावे नशिब आजमावून म्‍हणून त्‍यांनी दहा रुपयांचे लॉटरीचे तिकिट खरेदी केले... अन्‌ काय आश्चर्य, चक्क ५ हजार रुपयांची लॉटरी लागली. त्‍यामुळे या अंध व्यक्‍तीची दिवाळी चांगली झाली!
माटरगाव (ता. शेगाव) येथील अजबराव रामदास वानखडे यांनी खामगाव येथील महाराष्ट्र राज्य लॉटरीमधून दहा रुपयांचे तिकिट खरेदी केले होते. त्यांना महाराष्ट्र राज्य लॉटरीमध्ये २ नोव्‍हेंबरला झालेल्या गणेश लक्ष्मी सोडतीमध्ये पाच हजार रुपयांचे बक्षीस लागले. ऐन दिवाळी नशिबाने साथ दिल्याने या गरीब कुटुंबाची दिवाळी छानच झाली, असे म्‍हणावे लागेल.