कुणबी युवा मंचाकडून खामगावात बागेश्वर शास्त्रीचा जोडे मारून निषेध..जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बद्दल केले होते वादग्रस्त वक्तव्य!

 
खामगाव(भागवत राऊत: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंच यांच्या कडून खामगाव उपविभाग अधिकारी यांना निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला यावेळी (बागेश्वर) धिरेंद्र महाराज शास्त्री यांच्या प्रतिमेला जोडे मारून समाज बांधवांनी निषेध व्यक्त केला. 

महाराष्ट्राच्या संताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्रभूमीला व महामानवांन बदल सार्वजनिक सभा, कथा, राजकीय मेळाव्यात अवमान जनक उदगार काढून बदनाम करण्याची स्पर्धाचं सुरु असल्याचे दिसून येत आहे. छत्रपती शिवराय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या अवमान झाल्यावर आता थेट संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या बाबत बागेश्वर धीरेद्र शास्त्री नावाच्या तोतया व भोदू महाराज यांनी टिका केली आहे.

महाराष्ट्रात अंधश्रद्धा बाबत कायदा लागु असताना हा भोदु जनतेला अंधश्रध्दा व दैविकशक्तीच्या नावा खाली ठगत आहे.या भोदु विरेंद्र शास्त्रीवर संत तुकाराम महाराज यांच्या बाबत अवमान जनक वक्तव्य केल्या बाबत व अंधश्रद्धा पसरवण्या बाबत लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्यात यावे,अन्यथा संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंचच्या वतीने खामंगावसह संपूर्ण जिल्ह्यात आदोलन छेडण्यात येईल असा इशारा  निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी असंख्य कुणबी समाज बांधव व संत तुकाराम महाराज कुणबी  मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते.