खामगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेकृष्ण पवार झाले मलकापूरचे "डीवायएसपी"! गृह विभागाकडून बढतीचे आदेश...
Jun 24, 2026, 10:10 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शहर पोलीस ठाण्याच्या आपल्या ठाणेदार पदाच्या कारकिर्दीत कायद्याचा धाक निर्माण करणारे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणारे रामकृष्ण पवार आता डीवायएसपी झाले आहेत. शासनाच्या गृह विभागाने त्यांची बढती केली असून आता मलकापूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) म्हणून ते काम सांभाळतील..
रामकृष्ण पवार यांनी खामगाव शहराचे ठाणेदार म्हणून अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणले. अवैध धंद्यांवर कठोर कारवाई, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न, संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या खामगाव मध्ये सण उत्सव काळात ठेवलेला चोख बंदोबस्त यामुळे "जनतेचे ठाणेदार" म्हणून ते ओळखले जात होते. पदोन्नती झाल्यानंतर आता ते मलकापूर उपविभागाचा कार्यभार सांभाळणार आहेत. पोलिस उपनिरीक्षक ते डीवायएसपी असा रामकृष्ण पवार यांचा प्रवास राहिला असून पदोन्नतीमुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे..