खामगाव शहर पोलीस स्टेशनला मिळाला दबंग अधिकारी! नरेंद्र ठाकरे झाले खामगावचे ठाणेदार; उद्या घेणार पदभार...

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव मधील गुंड प्रवृत्तीच्या माणसांना धडकी भरविणारे वृत्त आहे. दबंग अधिकारी म्हणून लौकिक मिळवणारे नरेंद्र ठाकरे आता खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. आतापर्यंत शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार म्हणून जबाबदारी सांभाळणारे शांतीकुमार पाटील यांची एसपी सुनील कडासने यांची बुलडाणा येथे बदली केली असून त्यांच्या जागेवर नरेंद्र ठाकरे यांची नियुक्ती केली आहे.
                  जाहिरात 👆
नरेंद्र ठाकरे यांनी दबंग अधिकारी म्हणून लौकिक मिळवला आहे. अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार असताना तिथला कारभार त्यांनी चांगलाच वठणीवर आणला होता. सध्या ते जिल्हा विशेष शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. तिथेही त्यांनी प्रभावी कामकाज आले. खामगाव शहर पोलीस स्टेशनसारख्या संवेदनशील क्षेत्रासाठी खमक्या अधिकाऱ्याची गरज होती. नरेंद्र ठाकरे यांच्या रूपाने आता धडाकेबाज अधिकारी खामगाव शहर पोलीस स्टेशनला मिळाले आहेत. उद्या,८ डिसेंबरला ते पदभार स्वीकारणार आहेत.