खामगावात मराठा आरक्षणासाठी आता शाळकरी चिमुकलेही मैदानात!हातात फलक घेवून सरकारचा निषेध केला! म्हणाले...
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):मराठा आरक्षणासाठी सद्या संपूर्ण राज्यात मराठा समाजाच्या वतीने जोरदार व्यापक लढा लढला जात आहे.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात हा लढा सुरू आहे.सरकारने ४० दिवसांचा वेळ घेऊनही मराठा आरक्षणासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला राज्यभरात भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ खामगावाच्या टॉवर चौकात २९ ऑक्टोबर पासून सकल मराठा समाजाच्या वतीने आमरण, साखळी उपोषण सुरू आहे.काल संतप्त मराठा समाज बांधवांनी खामगाव बस स्टैंडवर बसेस वरील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला काळे फासून सरकारचा निषेध केला होता. यातच आता मराठा समाज बांधवांचे लहान शाळकरी चिमूकलेही मैदानात उतरल्याचे दिसले आहे. लहान शाळकरी चिमुकल्यांनी उपोषणाला भेट देवून फलक हातात घेवून सरकारचा निषेध केला. "आम्हालाही आरक्षण मिळाले पाहिजे, तो आमचा अधिकार आहे" असे यावेळी शाळकरी चिमुकले म्हणत होते.