म्हणे तुझ्यावर माझे खूप प्रेम! तुझ्याशीच करीन लगीन! तिला मोटरसायकलवर बसवून नेले, अन् तिथे गेल्यावर ती जोरजोरात ओरडायला लागली! वाचा तिच्यासोबत असं काय घडलं! खामगाव तालुक्यातील धक्कादायक घटना!

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, म्हणत त्याने तिला जबरदस्ती स्वताच्या दुचाकीवर बसवून नेल्याचे धक्कादायक घटना खामगाव तालुक्यात घडली आहे.
१७ वर्षीय अल्पवयीन तरुणी खामगाव येथील एका कॉलेज ला शिक्षण घेते. ती दररोज एस टी बस ने खामगाववरून ये जा करत असते. मात्र २० सप्टेंबर रोजी सकाळी ७.२५ वाजताच्या दरम्यान अल्पवयीन तरुणी कॉलेज ला जात होती.ती बसस्थानक खामगाव येथे बस मधून खाली उतरली. याचवेळी मंगेश एकनाथ वसतकार (वय २३ वर्ष, रा. टेंभुर्णा) हा तिथे त्या तरुणीचा पाठलाग करत मोटारसायकल घेवून आला. त्या तरुणीला थांबवून म्हणला चल तुला कॉलेज ला सोडतो. त्या तरुणीने मोटारसायकलवर बसण्यास नकार दिला. यावेळी मंगेश याने तिला मारण्याची धमकी देवून जबरदस्ती तिला आपल्या मोटारसायकलवर बसवून घाटपुरी येथील नवनाथ मंदिर येथे घेऊन गेला. येथे पोहोचल्यावर त्याने त्या मुलीचे दोन्ही हात जबरदस्तीने आपल्या हातात पकडून तिला म्हणाला, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. असे म्हटल्यानंतर ती मुलगी खूप घाबरली होती. त्यामुळे तिथे मोठ्याने ओरडायला ,रडायला लागली, यावेळी मंगेश हा तिथून त्याच्या मोटरसायकलने पळूनन निघून गेला. यानंतर ती मुलगी तिच्या कॉलेजमध्ये निघून गेली. कॉलेज संपल्यानंतर तिने हा घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला.
 शेवटी आज २३ सप्टेंबर रोजी मंगेश विरुद्ध अल्पवयीन मुलीने तशी तक्रार खामगाव गशहर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. पुढील तपास सपोनि धीरज बांडे करीत आहेत.