त्यांच्यावर नजर ठेवली, संध्याकाळी १ तासासाठी बाहेर गेले तेवढ्यात उरकला कार्यक्रम! खामगावच्या केला नगरातील धक्कादायक घटना! 

 
 खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अवघ्या एक तासासाठी ते सायंकाळी बाहेर गेले. जातांना घर बंद करून गेले..मात्र घरी आल्यानंतर त्यांना जे दिसले ते पाहून त्यांना धक्काच बसला. अवघ्या १ तासांत त्यांच्यावर नजर ठेवून कार्यक्रम उरकला. खामगावच्या केला नगरात ही धक्कादायक घटना घडली. चोरट्यांनी हा कार्यक्रम साधला.

केला नगरातील रहिवासी साकेत संजय दशोत्तर (३१) हे सायंकाळी साडेचार वाजता च्या सुमारास घर बंद करून कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्यावर नजर ठेवली. संध्याकाळी ५:३० वाजता जेव्हा ती घरी परतले तेव्हा घराचा कुलूप कोंडा तुटलेला होता. घरात जाऊन पाहणी केल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अज्ञात चोरट्यांनी बेडरूम मधील लोखंडी कपाटातील नगदी एक लाख वीस हजार रुपये आणि ६७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणाची तक्रार त्यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.