पतीला बोचकारले!; सासऱ्याला चावली... सूनेविरुद्ध सासू पोलीस ठाण्यात, खामगाव शहरातील घटना

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंगणातील गवत मजुराकडून पूर्ण का काढून घेतले नाही हे विचारणाऱ्या सासूला केस धरून लोटपोट केली. आईला वाचवायला धावलेल्या पतीलाही बोचकारले. त्‍यांना वाचवायला धावलेल्या सासऱ्यालाही चावा घेतला... ऐकायला आश्चर्यस्पद वाटत असली तरी सासूची तक्रार खरी मानली तर ही घटना असे खामगाव शहरात घडले आहे. तायडे कॉलनीत हा प्रकार आज, १३ जानेवारीला सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. खामगाव शहर पोलीस ठाण्यात सासूच्या तक्रारीवरून पोलिसांनी सूनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सौ. रजनी रमेश जोशी (७०, रा. तायडे कॉलनी खामगाव) यांनी आपल्या ३२ वर्षीय सूनेविरुद्ध तक्रार दिली आहे. त्‍यांना सुनेने शिविगाळ करून डोक्याचे केस पकडून लोटपाट केली. हाताने बोचकारले. उजव्या हाताला दाताने चावा घेतला. सासू ओरडली असता सासरा व पती मध्ये पडल्याने सुनेने पतीलाही बोचकारले. सासरच्या डाव्या हाताला दाताने चावा घेतला. त्यामुळे सासराही जखमी झाला. माझ्या जिवाचे बरेवाईट करून तुम्हाला जेलात टाकते, अशी धमकी सुनेने दिल्याचे सासूने तक्रारीत म्‍हटले आहे. तपास नापोकाँ रामेश्वर फासे करत आहेत.