तिचा फोटो व्हाट्सअप डीपीवर लावला अन् मॅटर पांगले! तिच्या नवऱ्याला माहीत झालं मग.... खामगाव तालुक्यातील घटना...

 
 
  घटना खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथील आहे. चिंचपूर येथील दिगांबर रघुनाथ हावरे याचे गावातील एका महिलेसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. दिगांबर हावरे याने त्याच्या व्हाट्सअप डीपीवर त्या विवाहित महिलेसोबत चा फोटो ठेवला. हे प्रकरण विवाहितेच्या नवऱ्याला माहीत झाल्यानंतर मोठा तमाशा झाला. मॅटर पोलीस ठाण्यात गेले, विवाहित महिलेनेच या प्रकरणाची तक्रार दिली. "हावरे याला तू माझ्याशी बोलू नको असे सांगितले होते, मात्र त्याने माझा वाईट उद्देशाने हात धरला होता.." असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. हिवरखेड पोलिसांनी याप्रकरणी दिगंबर हावरे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..