किन्ही महादेव येथे २ एप्रिलला भरणार भव्य यात्रा! शिवकालीन महादेवाच्या मंदिरावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळणार
Mar 28, 2023, 09:58 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दरवर्षी प्रमाणे यंदाही खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथे २ एप्रिल रोजी भव्य यात्रा भरणार आहे. किन्ही महादेव येथील श्री महादेवाचे मंदिर हे पुरातन असून शिवकालीन आहे. या ठिकाणी दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमी आणि चैत्र शुद्ध द्वादशी (आमली बारस) ला महादेवाची भव्य यात्रा भरत असते.
२९ मार्च रोजी रात्री १२.०१ मिनिटांनी शिवपार्वती विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला घोडे, आतषबाजी आकर्षक ठरत असते. या भव्य सोहळ्याला दरवर्षी खामगाव तालुक्यातील हजारो भाविक उपस्थित असतात.
याही वर्षी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून यात्रेचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहेत.