गौरवास्पद! मोरगावच्या (दिग्रस) CRPF जवान कुलदीप डाबेराव यांनी वाढवला जिल्ह्याचा गौरव! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते वीरता पोलीस पदक देऊन सन्मान
Mar 26, 2023, 09:13 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): छत्तीसगडच्या जगदलपुर इथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ८४ व्या स्थापना दिन समारंभात काल २५ मार्चला केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते जवानांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील मोरगाव (दिग्रस) चे सुपुत्र सीआरपीएफ जवान कुलदीप किसन डाबेराव (३१) यांना, वीरता पोलीस पदक देवून सन्मानित करण्यात आले.
याआधीही कुलदीप डाबेराव यांनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी मा. महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते वीरता पदक देऊन गौरविण्यात आले होते . त्यात आणखी एका पदकाची भर पडल्याने त्यांच्या कुटुंबासाठी व जिल्ह्यासाठी ही बाब अभिमानास्पद आहे.