लग्न जुळवणाऱ्या ॲपवरून ओळख..! नंतर लग्नाचं वचन... वचन तर पाळल नाही, बिचारीचे आयुष्य उध्वस्त केलं...हॉटेल मध्ये बोलवून नको ते केलं! खामगावची घटना
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा खामगाव तालुक्यातील अंबिकापुर येथील राहणारा आहे. आरोपीचे नाव कपिल बाबुराव हिवराळे असून तो ३४ वर्षाचा आहे. पीडित तरुणी अकोला जिल्ह्यातील एका गावची आहे..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख मेट्रोमोनियल ॲप वर झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत, मैत्रीतून जवळीक. त्यातून पुढे प्रेमाचे नाटक ,त्यानंतर शारीरिक भूक...असा दोघांचा प्रवास राहिला. आरोपी कपिलने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याशी अत्यंत जवळीक साधली, तिचा विश्वास संपादन केला.
खामगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये आरोपीने तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. तरुणी कडून वेगवेगळी कारणे सांगून कधी रोख रक्कम, कधी ऑनलाईन व्यवहार तसेच सोन्याची चैन अशा स्वरूपात आतापर्यंत ९ लाख ५४ हजार रुपये घेतले.दरम्यान आता मात्र आरोपी लग्नाला नकार देत आहे.शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले.