माळी समाजातील विवाहेच्‍छुकांचे २ जानेवारीला संमेलन

 
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद व संग्रामपूर तालुका महात्‍मा फुले माळी समाज मंडळातर्फे उपवर युवक- युवती परिचय संमेलन २ जानेवारीला आयोजित केले आहे.
संमेलनाच्या आयोजनासाठी माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्‍या अध्यक्षतेखाली जळगाव शहरातील कृषी विज्ञान केंद्रात बैठक घेण्यात आली. याच कृषी विज्ञान केंद्रात संमेलनही घेण्यात येणार आहे. संमेलनासाठी आयोजन समिती गठीत करण्यात आली. यात अध्यक्षपदी पांडुरंग वेरूळकर, कार्याध्यक्ष कैलास घुटे, सचिव डाॅ. अरुण राखोंडे, उपाध्यक्ष विनायकराव रहाटे, परमेश्वर वानखेडे, कोषाध्यक्ष श्रीराम निमकर्डे यांची सर्वानुमते निवड झाली. संमेलनात सहभागासाठी नोंदणी १३ डिसेंबरपर्यंत केली जाणार आहे.