खामगाव - शेगाव रोडवरील सुप्रीम हॉटेलात 'देहव्यापार'!तीन महिलांसह ११ जणांना शेगाव पोलिसांनी घेतले ताब्यात.. 

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शेगाव रोडवरील हॉटेल सुप्रीममध्ये चालू असलेल्या अनैतिक देहव्यापारावर छापा टाकून पोलिसांनी तीन महिलांसह अकरा जणांना ताब्यात घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.
शेगाव - खामगाव रोडवर असलेल्या हॉटेल सुप्रीम येथे स्त्रियांचा अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती शेगाव शहर पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारे ९ जून रोजी दुपारी ४.४५ वाजताच्या दरम्यान पोलिसांनी हॉटेल सुप्रीम येथे छापा टाकला होता. यावेळी तिथे अनैतिक देहव्यापार सुरू असल्याचे आढळुन आले. पोलिसांनी याठिकाणाहून तीन महिलांसह ११ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये श्रीकृष्ण गोकुळ शेंडगे (२६) रा. शेलोडी, रोहित उर्फ महादेव मधुकर टेकाळे (२५) रा. शेगाव, निलेश भारत टकले (२९) रा. शेलोडी, दीपक सुरेश खेळकर (२२) रा. निमकर्दा ता. बाळापूर जिल्हा - अकोला, योगेश गणेश ठाकरे (२२) रा. निमकर्दा ता. बाळापूर जिल्हा-अकोला, प्रवीण नारायण दोलतडे (२६) रा.शेलोडी, शरद प्रभुदास शेंडे (३५) रा. निमकर्दा ता.बाळापूर जि - अकोला, विनोद श्रीराम खेडकर (३२) रा. निमकर्दा ता. बाळापूर जिल्हा - अकोला यांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चार दुचाकी ( किंमत अंदाजे दोन लाख पाच हजार रुपये) नगदी बारा हजार तीनशे रुपये, दहा मोबाईल किंमत अंदाजे ९४ हजार रुपये, इतर साहित्य २२० रुपये. असा एकूण तीन लाख ११ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास ठाणेदार हेमंत ठाकरे करीत आहे.