मराठा आरक्षणासाठी शेगावात आजपासून आमरण उपोषण..!

 

बुलडाणा(ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मराठा आरक्षणासाठी मराठा समाज बांधव प्रचंड आक्रमक झाले आहेत. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सरकारला ४० दिवसांची मुदत देऊनही सरकारकडून ठोस काम न झाल्याने समाजबांधव संतप्त आहेत. परवा बीड जिल्ह्यात आमदारांचे घर जाळण्यात आले, कालही बुलडाणा जिल्ह्यातही ठिकठिकाणी निवेदन, उपोषणे, रास्तारोको झाले. खामगावात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. दरम्यान आजपासून संत नगरी शेगावात देखील मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषणाला सुरुवात होत आहे..

 शेगाव येथे आज,१ ऑक्टोबरपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषणाला प्रारंभ होणार आहे. दिलीप भीमराव पटोकार, विलास विश्वनाथ सोंडकर, रामदास जयदेव जाधव हे मराठी आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ उपोषणाला बसणार आहेत. खामगाव शहरात देखील चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे..