वृद्ध शेतकऱ्यावर रोहिंचा जीवघेणा हल्ला!खामगाव तालुक्यातील घटना

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ६० वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर रोहिने हल्ला केल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यात घडली. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गजानन पांडुरंग इंगळे (६०) रा. गवंढाळा हे त्याच्या स्वतःच्या अकोली येथील शिवारात गुरे चरण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक २५ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास सहा - सात रोही हे इंगळे यांच्या शेतात आले. त्यातील एकाने गजानन इंगळे यांच्यावर हल्ला चढवला. त्यात इंगळे हे गंभीर जखमी झाले आहेत. रोही च्या भीतीने इंगळे यांनी विहिरीत उडी मारली, त्यामुळे रोही तेथून निघून गेले.इंगळे यांना उपचारासाठी अटाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. तेथून त्यांना खामगाव येथे हलविण्यात आले.