ग्रामीण पत्रकार संघाच्या आयोजित कार्यक्रमात सर्वधर्म समभाव,एकतेची जोपासना करुन गावाचा विकास करा!राष्ट्रीय कीर्तनकार रामपाल महाराज यांचे प्रतिपादन..!
Jan 11, 2025, 15:06 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सर्वधर्म समभावाची जोपासना करून गावात गुण्या गोविंदाने वागून गावाचा विकास करा. मानव धर्म टिकून ठेवा असा संदेश संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून दिला आहे. त्याचा आदर्श घेऊन आपण वागलो पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय किर्तनकार सप्त खंदरीवाजक रामपाल महाराज यांनी समाज प्रबोधन करताना खामगाव तालुक्यातील बोरी - अडगाव येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातकेले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष"स्थानी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रमोदबापू देशमुख होते. प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी डॉ, रामेश्वर पुरी,गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत, विद्याताई तेजराव टिकार सरपंच बोरी यावेळी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे पत्रकार दिनानिमित्त खामगाव तालुका ग्रामीण पत्र संघाच्या वतीने समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. उत्कृष्ट शेतकरी. उत्कृष्ट व्यावसायिक. विविध क्षेत्रात नवलौकिक मिळविणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. खामगाव उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत यांच्या हस्ते सेवा क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना सुद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार सुधीर टिकार यांनी तर सूत्रसंचालन श्रीकृष्णा चौधरी यांनी केले. यावेळी खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर आप्पा भोसले, ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा संघटक संताराम तायडे, शिवाजीराव पाटील संघटक सचिव महाराष्ट्र राज्य रा, काँ पार्टी, तुषार गावंडे माजी उपसभापती, पं.स.खामगांव अमोल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष, सुभाष सुरवाडे तंटामुक्ती अध्यक्ष,अनिल खोडके प्रेस क्लब सचिव, पत्रकार नितेश मानकर, पत्रकार संभाजी टाले, पत्रकार सिद्धांत उंबरकार, यासह परिसरातील नागरिक, ग्रामस्थ बहूसंखेने उपस्थित होते.