BREAKING जळगांव जामोद वासियांनी अख्खी रात्र जागून काढली! घडलंच तसं भयंकर.....
Aug 23, 2024, 08:00 IST
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय.. जळगांव जामोद शहरातील म्हालपुरा, ताटीपुरा भागातील नागरिकांनी रात्र जागूनच काढली...त्याच कारणही तसंच...मागील वर्षी २२ जुलैला झालेली अतिवृष्टी आठवली की इथल्या नागरिकांच्या अंगावर आजही काटा येतो..मागील वर्षीच्या महापुराच्या जखमा अजूनही भरल्या नाहीत..अशातच त्या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होते की काय? अशी परिस्थिती रात्री निर्माण झाली..धो .धो पाऊस कोसळला..रात्री १ ते ३ यावेळेत असा पाऊस कोसळला की नदीला पूर आला, पुन्हा नदीकाठच्या घरांत पाणी घुसायला लागले...पावसाचा जोर वाढला तरी पुन्हा मागील वर्षी सारखी परिस्थिती निर्माण होईल म्हणून नागरिकांनी अख्खी रात्र जागून काढली..नदीकाठच्या लोकांनी घरातील लेकरा बाळांना दुसऱ्यांच्या घरात हलवले...अखेर पहाटे ३ नंतर पावसाचा जोर ओसरला..पुराचे पाणीही ओसरले आणि जळगाव जामोद वासियांनी सुटकेचा निःश्वास सोडला...