तरोडा, दाभाडी, तालखेड, बोराखेडी, नळगंगा, टाकरखेड गावांत बोराखेडी पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम! मॅटर काय? 

 
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ):  मोताळा तालुक्यातील दारू विक्री वाल्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत . बोराखेडी पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर  धडाकेबाज कारवाई केली आहे . अनेक गावांमध्ये छापेपारी टाकून ८८,६०० रूपांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गणेश उत्सव व ईद या सणानिमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा आणि दारू विक्रीवर आळा बसावा याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक. बीबी महामुनी यांच्या आदेशावरून बोराखेडी पोलिसांनी होत असलेल्या अवैध दारू विक्रीवर विशेष मोहीम राबवून कारवाई केली. यामध्ये  तरोडा, दाभाडी,  तालखेड, बोराखेडी, नळगंगा,  टाकरखेड या ठिकाणी छापे टाकून ८८,६०० रूपांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

यांनी केली कार्यवाही

पोलीस निरीक्षक. सारंग नवलकार, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. बालाजी शेंगेपल्लु, पोउपनि. राजेंद्र कपले, सफौ मधुकर महाजन, सफी.यशवंत तायडे, पोहेकॉ रामदास गायकवाड, सुपडंसिंग चव्हाण, दिपक पवार, अशोक आडोकार, पोना.अमोल खराडे, श्रीकांत चिटवार, पोकॉ.इरफान शेख, निलेश राठोड, आकाश यादव, श्रीकांत चिंचोले, गणेश बरडे, गणेश वाघ, रविंद्र नरोटे, प्रमोद साळोख यांनी ही कारवाई केली आहे.