मोताळा येथील शिबिरात ७६ युवकांचे रक्तदान! राजर्षी शाहू मल्टिस्टेट, राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनचा उपक्रम..
राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान १ मार्च रोजी मोताळा येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. संदीपदादा शेळके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन सकाळी ९ वाजता शिबिराला प्रारंभ झाला. शिबिरात ७६ जणांनी रक्तदान करुन उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. बुलडाणा अर्बन जीवनधारा ब्लड बँकेच्यावतीने रक्त संकलनाचे काम करण्यात आले. राजर्षी शाहू मल्टिस्टेट व राजर्षी शाहू फाउंडेशनच्यावतीने प्रत्येक रक्तदात्यास एक लाखाचे मोफत एक वर्षाचे अपघात विमा कवच देण्यात येणार आहे.
रक्तदान शिबिराला श्रीराम बोडदे, डॉ. रवींद्र महाजन, डॉ.अर्षद, डॉ. इंगळे, माजी सभापती संजय किनगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन मामलकर, सुरेश सरोदे, रावसाहेब देशमुख, नगरसेवक कैलास खर्चे, रवी पाटील, जलील खा, शे. सलीम चुना, निंबाजी इंगळे, विजय सुरडकर, आसिफ कुरेशी, बुढन जमदार, शे. गुफरान, अमोल देशमुख, पत्रकार गणेश पाटील, विष्णू शिराळ, श्रीकृष्ण पाटील, गणेश झंवर, रफिक सेठ, शे. सलिम शे. सुभेदार, विनोद ढोण आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी गजानन बोडदे, हमीद कुरेशी, प्रवीण जवरे, सुजित खर्चे, दिलीप जैस्वाल, मो. फारूक मो. शफी, रवींद्र राऊत, अमोल पाटील, काशिनाथ बिचकुले, पंडित बिचकुले, विशाल देशमुख, योगेश महाजन, निखिल शिंबरे, रोहित ठाकूर, वैभव मऱ्हे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.